श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त

Foto
विद्यमान संचालक मंडळावर | प्रशासकीय कारवाई

एक वर्षासाठी प्रशासकाची नियुक्ती

पैठण, (प्रतिनिधी) :  तालुक्यातील श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना मर्यादित या संस्थेच्या राजकीय व सहकार क्षेत्रात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७८ अ अंतर्गत तरतुदीनुसार कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळ विसर्जित करण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर), यांनी जारी केले आहेत. या निर्णयामुळे कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळातील
सदस्यांना पदावरून कमी करण्यात आले आहे.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) विशाल जाधवर यांनी १८ नोव्हेंबर २० २६ रोजी हा आदेशनिर्गमित केला आहे. या
आदेशानुसार कारखान्याच्या संचालक मंडळाचे विसर्जन करून संचालक मंडळातील सदस्यांना पदावरून कमी करण्यात आले आहे, दरम्यान, कारखान्याचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील तरतुदींनुसार सहाय्यक निबंधक बलराम मोहनराव नवथर, सहकारी संस्था, पैठण यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, ही नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून एक वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात प्रशासकीय आदेशामुळे पैठणच्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे

 आगामी कामकाज आता प्रशासकांच्या विशेष म्हणजे, या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेतील २६ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. न्यायालयाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्यासह प्रशासकीय कामकाजाचा कालावधी संपण्यापूर्वी नियमानुसार कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नियंत्रणाखाली चालणार आहे. या निर्णयानंतर कारखान्याच्या राजकीय व सहकार क्षेत्रातील
पुढील घडामोडींकडे सभासदांसह परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

-- बरखास्त संचालक मंडळ या प्रमाणे  -- 
अक्षय सुदामराव शिसोदे, दत्तात्रेय हरिभाऊ आमले, कचरू उत्तमराव बोबडे, दत्ता किशन वाकडे, दिगंबर सटवाजी गोरडे, तुषार काशिनाथ शिसोदे, प्रल्हाद कल्याणराव आवटे, गणेश प्रल्हादराव घायाळ, आवासाहेब शेवराव मोरे, एकनाथ बबन नवले, रविंद्र आवासाहेब बोडखे, भरत किसनराव घायाळ, प्रवीणकुमार भरतराव घायाळ, दीपक हरिचंद्र फंदाडे, शिवाजी नाना जाधव, बाबासाहेब एकनाथ खरात, रमेश कचरू झिने, विजया विक्रम घायाळ, ताराबाई रामेश्वर घायाळ, उबाबाई सुखदेव धोरात, अनुराधा कैलास तुपकरी आदी.