दोघे सहा महिन्यांकरिता जिल्ह्यातून हद्दपार

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपळदरी येथील दोघांना त्यांच्यातील गुन्हेगारी वर्तन, कृत्य कमी होत नसल्याने सहा महिन्यांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. कारवाई केली. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी ही कारवाई केली. सांडू छोटेमियाँ उर्फ कालू शेख (३२) आणि हारुण छोटेमियाँ उर्फ कालू शेख (२६) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

या दोघांवर अजिंठा पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. अनेकदा कारवाई करुनही त्यांच्या कृत्यात, वर्तनात थोडाही बदल होत नसल्याने परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता होती. 

गुन्हेगारी, हिंसक कृत्य रोखण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणाकरीता वरील दोघांना छत्रपती करण्याकरिता संभाजीनगर जिल्ह्यामधून तडीपार अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे, पोहेकॉ संतोष पाईकराव, रवींद्र बागुलकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ५५ अन्वये ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. 

यावरून ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी वरील दोघांना जिल्ह्यातून सहा महिन्यांकरीता हद्दपार केले.