औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीपूर्वी औरंगाबाद आणि जालना मतदारसंघात मोठे महाभारत घडले. औरंगाबाद मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला. तर पक्षश्रेष्ठी आपले ऐकत नसल्याचा आरोप करीत आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस पक्षाचाच राजीनामा दिला होता. या दोन्ही राजीनामा नाट्यने शिवसेना अन काँग्रेस चा पराभव झाल्याचे बोलले जाते.काँग्रेस पक्षातील वजनदार नेते माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नाराजीकडे काँग्रेस पक्षाने साफ दुर्लक्ष केले. प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक असलेले सत्तार अखेरच्या त्क्षणी काँग्रेसला मदत करतील, अशी अटकळ लावली जात होती. मात्र ती फोल ठरली. अखेरपर्यंत सत्तार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न काँग्रेसने केलेच नाहीत. अखेर सत्तार यांनी काँग्रेसला नामोहरम करण्याचा चंगच बांधला.
औरंगाबाद आणि जालना या दोन मतदारसंघात प्रभाव असलेले सत्तार यांना डिवचून काँग्रेसने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाडच मारून घेतली. जालना मतदारसंघातील सिल्लोड, पैठण आणि फुलंब्री या तीनही मतदारसंघात सत्तार फॅक्टर चाललाय हे स्पष्ट दिसते. यावेळी काँग्रेस उमेदवार विलास अवताडे यांना सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अवधी 44 हजार 988 मिळाली. पैठण 68 हजार 214 तर फुलंब्री मतदार संघात 7279 एवढीच मते काँग्रेसला मिळाली औरंगाबाद मतदार संघातही सत्तार फॅक्टर प्रभावी ठरला आहे. झांबड यांना कन्नड विधानसभा मतदारसंघात अवघी ११ हजार १८५ मते मिळाली. गंगापूर १२७८१, वैजापूर २० हजार ८७६, पूर्व १४०९६ पश्चिम १५५९५, मध्य १४१५५ अशी मते मिळाली. गेल्या निवडणुकीचा विचार करता काँग्रेस उमेदवाराची मते मोठ्या प्रमाणावर एमआयएमकडे वळल्याचे दिसून आले. आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा शिवसेनेला चांगलाच महागात पडला. जाधव यांनी शिवसेनेची हक्काची मतपेटी पळवली. ग्रामीण भागात शिवसेनेचा जोर आहे. त्याच गंगापूरात जाधव यांनी तब्बल ६४ हजार ३९३ मते घेतली. विशेष म्हणजे येथे भाजपचा आमदार आहे. आमदार सावे यांच्या पूर्व मतदारसंघात जाधव यांनी २५,६१९ तर शिवसेेेनेचे आमदार असलेल्या पश्चिम मतदारसंघात जाधव यांनी तब्बल ३८,०८७ मते घेत सेनेची हक्काची मत पेटी पळवली. वैजापूर ५५,५५४ मते जाधव यांनी घेतली. कन्नड हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो या मतदारसंघात हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल ६९,३७४ मध्ये घेऊन खैरे यांचा पराभव निश्चित केला. औरंगाबाद मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रात जाधवांनी सेनेच्या मतांची फाटाफूट केली यात शंका नाही. एकंदरीत जालना आणि औरंगाबाद या दोन्ही मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या नाराजीने पक्षाला पराभव पत्कारावा लागला असे बोलले जाते.
भाजपला हवाय मुस्लिम चेहरा !
विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तार भाजपवासी होणार असल्याची चर्चा आहे. थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत कडूनच तशी ऑफर आल्याचे समजते. भाजपलाही मराठवाड्यात मुस्लिम चेहऱ्याची गरज आहे. सत्तार यांच्या रुपाने मराठवाड्यात मुस्लिम चेहरा भाजपला मिळू शकतो. भविष्यात इम्तियाज जलील यांचा पर्याय म्हणूनही सत्तार यांच्याकडे पाहिले जाऊ शकते, असा मतप्रवाह भाजपमध्ये आहे. सत्तार यांचा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात घेण्यात येत असल्याने अन त्या मतदारसंघात भाजपकडे प्रबळ उमेदवार असल्याने सत्तार यांना जालण्यातून लोकसभेसाठी संधी नाही. सत्तार यांनी औरंगाबादेत काम करावे, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. यापुढे सत्तार यांनी औरंगाबाद मतदारसंघात लक्ष केंद्रित केले तर नवल वाटू नये.
सत्तार आता विखेच्या गोटात...
काँग्रेसमध्येग्रे असताना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या या गटातील मानले जाणारे सत्तार आता राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गोटात शिरले आहेत. विखे लवकरच भाजपवासी होऊन मंत्रीपद पटकावणार आहेत. त्यांच्यासोबत आपलीही वर्णी लागावी यासाठी सत्तार संगमनेरला चकरा मारत असल्याचे बोलले जाते.