प्रतापसिंह पाटलांकडे ४८ कोटी तर सतीश चव्हाणांकडे ३८ कोटींची संपत्ती
छत्रपती ब्युरो) : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता अंतिम ४१ उमेदवार रिंगणात उरले आहेत. रिंगणातील उमेदवारांची संख्या मोठी असली, तरी खरी लढत ही प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्येच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार प्रतापसिंह पाटील ४८ कोटी २४ लाख रुपयांच्या मालमत्तेसह सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. तर पदवीधरचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलेले आमदार सतीश चव्हाण यांची मालमत्ता ३८ कोटी रुपये, तर दिलीप घुगे यांची मालमत्ता १ कोटी २६ लाख रुपये इतकी आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख उमेदवार संभाजीनगर, (सांजवार्ता कोट्यधीश असल्याचे समोर आले आहे.
सध्या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांच्या संपत्तीचीच चर्चा सुरू आहे. यात प्रामुख्याने विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दिलेले उमेदवार पाटील यांची संपत्ती अधिक असल्याचे शपथपत्रात नमूद आकडेवारीवरून दिसत आहे. तर या दोन्ही उमेदवारांपैकी उबाठाचे घुगे हे १ कोटी २६ लाखांचे मालक आहेत. त्यात सोन्याच्या दागिन्यांसह शेत व प्लॉटच्या
चव्हाण २९ कोटींचे मालक
▶ राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ.प.) उमेदवार विद्यमान आमदार सतीश चव्हाण चौथ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. प्रतिज्ञापत्रात त्यांनी पती-पत्नीची ३८ कोटी रुपयांची जंगम व स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले. त्यात १३ कोटीचे दागिने, गुंतवणूक व ठेवींचा समावेश आहे. तर २५ कोटींची शेतजमीन, प्लॉट व इतर मालमत्ता आहेत. सद्यः स्थितीत ३ लाख २१ हजार रुपये, तर पत्नीकडे ६२ हजार रुपये रोख आहेत. शिवाय पती-पत्नीच्या नावे ६ कोटी रुपयांचे कर्ज आहेत. राजकीय अनुभव आणि यापूर्वीच्या विजयांच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांची उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे.
महागड्या कारसह दागिन्यांचा समावेश
▶ मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) उमेदवार प्रतापसिंह पाटील हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांनी प्रतिज्ञापत्रात ४८ कोटी २४ लाख रुपयांची जंगम व स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे. यामध्ये ८ कोटी १० लाख रुपयांच्या जंगम, तर ३९ कोटी ३४ लाख रुपयांच्या स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे २५ लाख रुपये, तर पत्नीच्या नावे २० लाख रुपये रोख असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्यांच्या मालमत्तेत महागड्या कारसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचाही समावेश आहे.
घुगेंकडे सव्वा कोटीची संपत्ती
▶ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप घुगे यांनी प्रतिज्ञापत्रात एक कोटी १३ लाख रुपयांची स्थावर, तर १३ लाख रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती १ कोटी २६ लाख रुपये आहे. पाटील आणि चव्हाण यांच्या तुलनेत घुगे यांची जाहीर मालमत्ता लक्षणीयरीत्या कमी आहे.
किमतीचा समावेश आहे. आमदार चव्हाण प्लॉट आणि रोख रकमेचा समावेश अधिक आहे.
यांच्यापेक्षा पाटील यांच्याकडे शेतजमिनीसह
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














