लाचखोर अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत मंजुर झालेल्या घराचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी तक्रारदाराच्या कामाची स्थळ पाहणी (जिओ टॅगिंग) करून त्याचे फोटो अपलोड करण्याच्या कामासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना अभियंत्यास रंगेहाथ पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (२९ जून) दुपारी ही कारवाई केली.

प्रवीण गायकवाड (रा. पानवी, ता. वैजापूर) असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. तो वैजापूर पंचायत समिती कार्यालयातील डवाळा खंबाळा भागात ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून कार्यरत आहे.

तक्रारदार यांचे पंतप्रधान घरकुल निवास योजनेतून घरकुल मंजुर झाले होते. होते. या घरकुलाचा पहिला हप्ता तक्रारदार यांना मिळाला होता. परंतु दुसरा हप्ता मिळण्यासाठी अभियंता गायकवाड यांनी घरकुल कामांची स्थळ पाहणी (जिओ वैजापूर पंचायत समितीत रचला सापळा करून फोटो अपलोड करण्यासाठी तक्रारदाराकडे एक हजार रुपये रुपयांची मागणी केली होती. 

मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार नोंदवली. घरकुलाच्या कामाच्या दुसऱ्या हप्त्याच्या बिलाचा ७५ हजार रुपयांचा चेक (धनादेश) काढून देण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी करून स्वीकारण्याचे पंचांसमक्ष मान्य केले.

त्याअनुषंगाने, पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे, पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, हे.कॉ. रवींद्र काळे, अशोक नागरगोजे, युवराज हिवाळे, चांगदेव बागुल, रामेश्वर ताठे यांनी सोमवारी दुपारी पंचायत समिती कार्यालयात साफळा रचला. यावेळी अभियंता गायकवाड यास एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.