लाचखोर वैद्यकीय अधीक्षकाला तीन दिवसांची पोलीस कोठडी

Foto
बिडकीन, (प्रतिनिधी): बिडकीन ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक विजय दळवी यांना पैठण न्यायालय समोर हजर केले असता न्यायालयाने दोन्हीही आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये सोमवारी (दि. ६) छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विभागाने सापळा लावून कंत्राटी कामगार नारायण ब्राह्मणे. याला बिडकीन येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय दळवी यांच्यासाठी बाराशे रुपये लाच घेताना रंगेहात पकडले होते. मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी लाचखोर वैद्यकीय अधीक्षकाला बाराशे रुपयाची लाच हवी होती.

त्यानंतर त्यांना मंगळवारी (दि. ७) रोजी पैठण न्यायालय समोर हजर केले असता तीन दिवसाचे पोलीस कोठडी सुनवली आहे. बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये शस्त्रक्रिया व शिजर साठी व गरोदर महिलांना प्रसुतीसाठी पैसे मोजावे लागत असल्याची कुजबुज बिडकीन गावात सुरू आहे.

वरिष्ठ अधिकारी या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप काही नागरिक करत आहे. त्या रुग्णाच्या नातेवाकांनी पैसे देण्यासाठी तयारी दर्शवली नाही. तर त्या रुग्णाला थेट छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये रेफर केले जाते. असे स्थानिक नागरिकाचे म्हणणे आहे.