नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'मोदी सरकार-२' चा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला. मोदी सरकार-२ च्या पहिला अर्थसंकल्पात नेमकं काय काय असणार याकडे देशाचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे अर्थमंत्री म्हणून हा निर्मला सीतारामन यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे . पुढील आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी ७ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज काल आर्थिक पाहणी अहवाल सादर करताना सीतारामन यांनी व्यक्त केला.
अर्थ संकल्प ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची प्रथा आहे. मात्र यंदा ही प्रथा मोडीत काढण्यात आली. सीतारामन लाल कापडात गुंडाळून अर्थसंकल्प घेऊन अर्थ मंत्रालयात आल्या. सीतारामन यांच्याकडे ब्रिफकेस नसल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. त्यामागील कारण मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमणियन यांनी सांगितले. ’अर्थसंकल्पाला आपण चोपड्या म्हणतो. चोपड्या लाल रंगाच्या कपड्यात असतात. ती आपली परंपरा आहे,’ असे सुब्रमणियन म्हणाले. आपण आता गुलाम नाही, हेदेखील सीतारामन यांनी कृतीतून दाखवून दिल्याचे मुख्य आर्थिक सल्लागारांनी सांगितले. पाश्चात्यांच्या गुलामीतून आम्ही बाहेर पडलो आहोत, हे सीतारामन यांनी दाखवून दिले आहे, असे सुब्रमणियन म्हणाले.