औरंगाबाद: मनपाचे २०१९-२० या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाचे आज शुक्रवारी सकाळी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या वतीने स्थायी समिती समोर सादरीकरण करण्यात येत आहे. ६०० ते ७००कोटी रुपये उत्पन्न असनाऱ्या मनपाचा यंदाचा बजेट ट्वेंटी-ट्वेंटी म्हणजेच २०२० कोटींवर गेला आहे. यंदाचा बजेटही फुगवण्यात आल्याची चर्चा सभागृहात एकायला मिळाली.
मनपा प्रशासनाने लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात चार महिन्याचे लेखा अनुदान तयार करून त्यास मंजुरी घेतली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यामुळे प्रशासनाने अर्थसंकल्प तयार करण्याचे काम हाती घेतले होते. या अर्थसंकल्पीय अनदाजपत्रकाचे आज शुक्रवारी मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक यांनी स्थायी समिती समोर सादर केले. यंदाचे अंदाजपत्रक हे २०२०.२४ कोटींचे आहे. यात पाणी पुरावठ्या करीत ४००, रस्त्याकरीता ४००,कचरा प्रक्रिया प्रकल्पाकरिता १०० कोटी रुपये असल्याचे विनायक यांनी सांगितले. यंदा शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार असल्याचे सांगत यात रस्त्याकरीता १४५ कोटी, कचऱ्याकरिता १२२,नवीन पाणी पुरावठा योजनेकरिता देखील समावेश आहे. यानंतर आयुक्तांनी यावेळी वसुली वाढविण्याकरिता देखील योजना सुचवल्या. एकीकडे मनपाच्या तिजोरीत खडखडाट असताना उत्पन्ना पेक्ष दुपटीने तिपटीने आकडा फुगवण्याचे काम केले जाते. गेल्या वर्षी प्रशासनाने १२४४ कोटीचा अर्थसंकल्प तयार केला होता. त्यामध्ये स्थायी समितीने २०० कोटीच्या कामांची वाढ सुचवली. सर्वसाधारण सभेत हा अर्थसंकल्प १८६४ कोटीवर गेला. महापालिकेच्या तिजोरीत मात्र वर्षाला जेमतेम ६०० ते ७०० कोटी रुपये जमा होत असल्याने यंदा अर्थसंकल्पात अनावश्यक कामांना कात्री लावली जाण्याची शक्यता होती. यंदाच्या अर्थसंकल्पाने २ हजार कोटींची टप्प ओलांडला या अंदाजपत्रकाचा अभ्यास करण्याकरिता वेळ देण्याची मागणी केल्या नंतर स्थयी समितीची सभा तहकूब करण्यात आली.









