छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) नवरा बाहेरगावी... घरात फक्त वृद्ध आई... मध्यरात्री दोघी झोपेत असताना मागच्या दाराने चोर घरात शिरला अन थेट वरच्या मजल्यावर गेला, तिला चाहूल लागली. घरात लोणच्याचे आंबे कापण्याचा मोठा कोयता हातात घेत ती थेट वरच्या मजल्यावर गेली. चोरट्याची गचंडी पकडत
त्याला खाली आणले. मात्र संधी साधून त्याने धूम ठोकली. स्वाती कुलकर्णी असे या रणरागिणीचे नाव. त्यांच्या या धाडसाचे आता कौतूक होत आहे. बीड बायपास परिसरातील सेनानगरवासियांनी आज सकाळी या रणरागिणीचा सत्कार केला.
झाले असे, भल्या पहाटे भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांचा फोन खणाणला.
शेजारीच राहणाऱ्या स्वाती कुलकर्णी यांनी त्यांना मदतीसाठी
हाक दिली होती. वेळ न दवडता शितोळे कुटूंबीय मदतीला धावले. त्यावेळी घरासमोर स्वाती कुळकर्णी हातात कोयता घेऊन उभ्या होत्या.
त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना कोणता ताण. त्या सांगू लागल्या. चोरटा घरात मागच्या दाराने आला अन् वरच्या मजल्यावर गेला होता, चाहूल लागल्याने मी जागे झाले.
हळूच वर गेले, पाहते तर चोर आमचे कपाट उघडत होता. मी हळूच तशीच खाली आले. घरातला कोयता घेतला आणि पुन्हा वर गेले. दारात उभे राहून त्याला दरडावले. निघतोस बाहेर का कापू तुला? चोर एकदम घाबरला, बाहेरही येईना. मी आत जाऊन त्याची गचांडी धरली, त्याच्या मानेला कोयता लावत त्याला खालच्या मजल्यावर
ओढत आणले. तो माझ्या हाताला झटके देत निसटण्याचा प्रयत्न करत होता. हाताला झटके मारत होता. अन दुसरीकडे म्हणत होता किती गावरान आहेस तू, किती गावरान आहेस तू... त्याची गचांडी पकडून मोठ्याने आरडाओरड करत मी त्याला खाली घेऊन आले.
त्याने हाताला झटका दिला अन् गेटमधून बाहेर गेला. बाहेर
स्वाती कुलकर्णी यांच्या धाडसाने रहिवासी अवाक झाले. घरात वयस्कर आई अन् त्या अशा फक्त दोघीच असताना त्यांनी दाखविलेले धाडस कौतूकास्पद आहे. चोराला पाहून न घाबरता, आरडाओरडा न करता खाली आल्या कोयता घेतला, पुन्हा वर जाऊन त्याला धरले. तो नशेत असेल, त्याच्याकडे काही हत्यार असेल किंवा स्वातीताईचाच कोयता हिसकावून तिलाच काही केले असते तर. मात्र ज्या हिंमतीने त्यांनी चोरट्याला धडा शिकवला ते प्रेरणादायी आहे. म्हणून आज कॉलनीवासियांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
- किशोर शितोळे भाजप शहर जिल्हाध्यक्ष
जाताच त्याने रस्त्यावरची वीट उचलली आणि शिव्या देत मिरकावली. मी वीट
चुकवायला गरकण वळले तर ती वीट माझ्या पाठीवर लागली.