गुन्हेगारांच्या मालमत्तांवर बुलडोझर

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पोलिस प्रशासनाने अट्टल गुन्हेगारांच्या अवैध मालमत्तांवर आता थेट कारवाईचा निर्णय घेतला. यासाठी ६० सराईत गुन्हेगारांची आणि त्यांच्या मालमत्तेची यादीही तयार करण्यात आली. आता लवकरच ही यादी महापालिकेकडे सोपविण्यात येणार आहे. त्यांच्या बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोजर चालवला जाण्याची मागणी केली जाणार आहे. यातील कुणा आरोपीवर २९ तर कुणावर २३ गुन्हे नोंद असल्याचे सूत्रांनी सांगितले. अमली पदार्थ विक्री विरोधात पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केल्या. अनेक गुन्हेगारांची निवासस्थाने गल्ली बोळात आहेत. येथे दुचाकीने जाणेही अवघड आहे. अशा ठिकाणी कारवाई करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.