नागमठाण शिवारात ऊस आगीत खाक

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी): विद्युत वाहिनीच्या खांबावर झालेल्या स्पार्किंगमुळे उसाच्या शेताला भीषण आग लागून तब्बल ४ एकर ऊस व शेतातील शेतीचे साहित्य खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी दोन वाजता नागमठाण शिवारातील गट. क्र. २९० मध्ये घडली.

दुष्काळाशी दोन हात करून कसेबसे उसाचे पीक वाचवले. मात्र, हातातोंडाशी घास हिरवला गेला आहे. नागमठाण शिवारातील गट क्र. २९० मध्ये शेतकरी गोकुळ आसाराम तागड, कृष्णा आसाराम तागड व आसाराम बारकू तागड यांच्या संयुक्त उसाच्या फडाला अचानक आग लागली. या आगीत ४ एकरवरील ऊस, अंदाजे किंमत ४ ते ५ लाख रुपये, शेतातील सोलर पॅनल किंमत १ ते दीड लाख रुपये तसेच स्प्रिंकलर, ठिबक, पाईप किंमत ८० ते ९० हजार रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठी आर्थिक नुकसान झाले आहे. 

महावितरणच्या नागमठाण उपकेंद्रातून जाणाऱ्या नागमठाण गाव फीडरवरील पोल आणि एबी स्विचवर स्पार्किंग झाल्याने ही आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ तंत्रज्ञ वाय. व्ही. कदम यांनी तातडीने कनिष्ठ अभियंता विलास कोळेकर यांना कळवले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी
वीजपुरवठा खंडित केला आणि घटनास्थळी धाव घेतली.

आग विझवण्यासाठी वैजापूर नगर परिषदेच्य अग्निशमन दलाच्या गाडीला बोलवण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी यांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र, तीव्र उन्हामुळे या आगीने रौद्ररूप् धारण केले. आग आटोक्यात येईपर्यंत शेतातील संपूर्ण ४ एकर क्षेत्रातील उसाचे पीक व साहित्य पूर्णपणे खाक झाले होते.

 ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या दुर्घटनेनंतर रविवार रोज ग्राम महसूल अधिकारी गावंडे, महावितरणचे कनिष्ठ अभियंता विलास कोळेकर यांन प्रत्यक्ष पाहणी करून घटनास्थळी शेतकर कृष्णा आसाराम तागड आणि पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महावितरण आणि शासनाकडून लवकरात लवक नुकसानभरपाई मिळावी, अशी मागण शेतकऱ्यांनी केली आहे.