सीजेपी दबाव गट म्हणून काम करेल, भारताला जनआंदोलनाची गरज : अभिजित दीपके

Foto
छत्रपती संभाजीनगर : लोकांनी आपापली विचारसरणी आणि राजकीय पक्ष बाजूला ठेवत एकत्र येण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आमची चळवळ यशस्वी झाली. आज भारताला जनआंदोलनाची गरज आहे. त्यामुळे सध्या तरी सीजेपी दबाव गट म्हणून काम करेल. भारताला सध्या अशाच दबाव गटाची गरज आहे अशी प्रतिक्रिया अभिजीत दीपके यांनी दिली. राजकीय पक्ष स्थापन करणार का असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता. 

कॉकरोच जनता पार्टीची आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक आहे. या बैठकीसाठी सीजेपीचे महत्वाचे पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. अभिजीत दिपके यांच्या घरीच ही बैठक आहे. पक्षाचे पुढचे ध्येय धोरणे आणि संघटना कशी वाढवायची याकरिता ही बैठक आहे. सौरभ रांका यांच्यासह महत्वाचे पदाधिकारी अभिजीत दिपकेंच्या घरी दाखल झाले. जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. कॉकरोच जनता पार्टीचा हा मोठा विजय होता. आता कॉकरोच जनता पार्टी नक्की काय निर्णय घेते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. १२ वर्षात पहिल्याच राजीनामा कॉकरोच जनता पार्टी यांच्या आंदोलनानंतर भाजपामधील झाला. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात मोठे आंदोलन अभिजीत दिपके यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

आता नुकताच अभिजीत दिपके यांनी छत्रपती संभाजीनगरमधील कॉकरोच जनता पार्टीच्या बैठकीवर मोठे भाष्य केले. अभिजीत दिपके यांनी म्हटले की, आमचा पुढचा रोड मॅप, देशभरात संघटन कसं वाढवला जाईल या बैठकीत आम्ही चर्चा करणार आहोत. झारखंडच्या आंदोलना संदर्भात आम्ही बोललो आहे, त्यांना पूर्ण समर्थन दिल आहे. झारखंडच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी जाणार आहोत.

पुढे अभिजीत दिपके यांनी म्हटले की, आमची राजकारणात जाण्याची इच्छा नाही. पण, मीडियावाल्यांना त्याची उत्सुकता आहे. आज राजकीय पक्षाची परिस्थिती खूप वाईट आहे. सकाळी आमदार खासदार एका पक्षात असतो, संध्याकाळी दुसर्‍या पक्षात असतो. मीडिया, न्यायपालिका, बेरोजगारी, ए२० यावर आम्ही या बैठकीत चर्चा करणार आहोत.

सोनम वागचूक यांची तब्येत बरी नाही, त्यामुळे ते या बैठकीला नाहीत. उद्या दुपारी दोन वाजता आणि माध्यमांची संवाद साधू, असेही अभिजीत दिपके यांनी म्हटले. अभिजीत दिपके गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता कॉकरोच जनता पार्टीचे भविष्य आंदोलनानंतर नक्की काय असणार असा सवाल वारंवार केला जात आहे. त्यात मोठा निर्णय कॉकरोच जनता पार्टीने घेतला. ते लवकरच मोठी घोषणा करू शकतात.