छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (सीएमआयए) यांच्या वतीने उद्योजकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे व्यवसायात परिवर्तन या विषयावर १४ व १५ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत सुमारे ४० उद्योजक, व्यावसायिक आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी झाले. सहभागी
कार्यशाळेत सीए उमेश शर्मा, सीए अभिनव शर्मा आणि रितेश शर्मा यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत कृत्रिम
बुद्धिमत्तेची संकल्पना, तिच्या कार्यपद्धती, उद्योग-व्यवसायातील उपयोग आणि भविष्यातील संधी यांची माहिती देण्यात आली. कंपन्यांसाठी स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करणे, कोणती माहिती अशा साधनांमध्ये वापरावी आणि कोणती माहिती सामायिक करू नये, तसेच
डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याच्या तरतुदी आणि त्यांचे व्यवसायांवरील परिणाम यांवर चर्चा करण्यात आली. सीएमआयएचे मानद सचिव अजिंक्य सावे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले, तर सीएमआयएच्या कार्यकारी समितीचे सदस्य अनिकेत पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions