सिल्लोड, (प्रतिनिधी) भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने सिल्लोड शहरातील कॉम्रेड करिमोदिन नाना चौकाला पुष्पहार टाकून पासून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चेत शेतकरी शेतमजूर गायरानधारक मोठ्या संख्याने सहभागी झाले होते. सरकारने दुष्काळ जाहीर केले.
परंतु अजूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली नाहीत. या दुष्काळी मदतीतून गायरान धारकांना वंचित ठेवण्यात आले. त्यांनी ही गायरान जमिन मध्य पेरणीसाठी खर्च केला आहेत. म्हणून त्यांना ही दुष्काळी आर्थिक मदत दिली पाहिजे. सिल्लोड तालुक्यातील गायरान जमिनीवर उभारणीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली.
जानवरा साठी चारा पाण्याची व्यवस्था करण्यात यावी व ग्रामीण भागातील लोकांना रोजगार देण्यात यावा अशा विविध मागण्याचे निवेदन सिल्लोड तहसीलदार वाघमारे यांना देण्यात आले. पुढे हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला तिथे आल्यानंतर तहसिल कार्यालयला घेराव घालण्यात आले. यावेळी भर उन्हात हा मोर्चा निघाला होता या मोर्चात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. शेतकरी शेतमजूर गायरान धारकांनी करपलेल्या सोयाबीन व मका, कपाशी यांची झाडे घेऊन तहसीलदार समोर आपल्या व्यर्थ मांडल्या. सरकारने आमच्या अंत पाहू नये असे यावेळी असे मोर्चे करी म्हणाले.
यावेळी अॅण्ड कॉम्रेड अभय टाकसाळ (जिल्हा सचिव भाकपा संभाजी नगर) कॉम्रेड सय्यद अनिस (सह सचिव भाकपा संभाजी नगर), कॉम्रेड तारा बनसोडे, कॉम्रेड त्रिबक शेजुळ, साहेबराव दनके यांनी भाषण केले. यावेळी कॉम्रेड बाळू पाटील शिन्दे, कॉम्रेड पुंजाराम कांबळे, कॉम्रेड शेख इशाक, कॉम्रेड केशवराव पाटील ढोरमारे, कॉम्रेड शेख बाबु, कॉम्रेड आशोक गायकवाड, हिराजी पा. जंजाळ, भाऊ पा. जंजाळ, दादाराव सोनवणे, रमेश गायकवाड, कांताताई सोनवणे, छायाताई गायकवाड, शिवराम कांबळे, सोमीनाथ कांबळे, सांडू उमरे, रामेश्वर कांबळे, देवलाल रेसवाल, संजय शेजूळ, चंद्रहार दांडगे, शेख अब्दुल प्रभाकर गायकवाड, दादाराव शेजूळ, भागवत शेजुळ, इरफान पठाण, शेख नदिम, शेख समिर, शेख रिजवान, हमिद पठाण, सुभान पठान, शेख जाहेद, शेख अय्युब, शेख बाबा, शेख गुड्डू, रुक्मणी बाई शेळके आदि सहभागी झाले.















