सिल्लोड येथे स्मार्ट मीटर विरुद्ध भाकपचे निदर्शने

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी)  :  भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सिल्लोड येथील महावितरण कार्यालयासमोर गुरुवारी एक तास निदर्शने करण्यात आली. त्यात जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवू नये अशी मागणी करण्यात आली. यावेळी कॉम्रेड सय्यद अनिस म्हणाले की, महाराष्ट्रातील राज्य सरकार हे उद्योगपतीचे हाताचे बाहुले बनलेले आहेत.

मोठमोठ्या उद्योगपतींना स्मार्ट मीटर लावण्याचे टेंडर देण्यात आलेले आहेत. स्मार्ट मीटर लावून जास्तीची बिल आकारणी करून. गोरगरीब लोकांच्या कष्टाच्या कमाई लुटण्याचा काम राज्य सरकार करत आहे. स्मार्ट मीटर जबरदस्तीने लावू नये. नसता सिल्लोड येथील महावितरण कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. 

यावेळी त्रिंबक शेजुळ, शेख इमरान यांनी मार्गदर्शन केले. शहर अभियंता धम्मपाल म्हस्के यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सहसचिव बाळू पाटील शिंदे, शहर सचिव अशोक गायकवाड, केशवराव पाटील ढोरमारे, देवलाल जैस्वाल, शेख बाबू, भानुदास सांगळे, प्रभाकर गायकवाड, चंद्रहार दांडगे, गणेश शेजुळ, शेख कदीर, रत्नाकर शेजुळ, हमीद पठाण, सुनिता दांडगे, दादाराव सोनवणे, शेख अब्दुल, शेख अजीम, इरफान पठाण, शेख शाकेर, सय्यद
मोईनोदिन, उपनिरिक्षक मुंढे, कायंदे, पोलिस कर्मचारी पगारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. स्मार्ट मीटर नाही चलेगा, महावितरण कंपनी मुर्दाबाद असे नारे यावेळी देण्यात आले. पोलीस