पैठण, (प्रतिनिधी) : कै. भाऊरावजी पाटील शिसोदे हे अत्यंत बिकट परिस्थितीत ज्ञानाची गंगा सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्यासाठी काम करणारे महापुरुष होते. त्यांनी शिक्षण हीच आपल्या विकासाची खरी नाडी आहे हे ओळखून प्रतिष्ठान महाविद्यालयाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहे.
हे भाऊराव पाटलांचे शैक्षणिक कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी अशा स्वरूपाचे आहे असे प्रतिपादन प्रतिष्ठान महाविद्यालयाचे माजी प्रबंधक पी. एस. मेनन यांनी केले. गुरुवारी रोजी प्रतिष्ठान महाविद्यालयात झालेल्या कै. भाऊराव पाटील शिसोदे यांच्या ३१ व्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक नारायणराव गोंडे पाटील हे होते. त्यांनीही नानांच्या आठवणींना उजाळा दिला.
संस्थेच्या विकासाची भूमिका मांडताना सन्माननीय सचिव राजेंद्रजी पाटील शिसोदे यांनी कै. भाऊराव पाटलांचा वारसा आम्ही नेटाने पुढे नेऊ आणि संस्थेचा विकास करू अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाच्या आलिशान नूतन कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील शिसोदे, उपाध्यक्ष अशोकराव पाटील निर्मळ, संचालक श्रीधरराव पाटील शिसोदे, विजयकुमार पाटील शिसोदे, सुशील पाटील शिसोदे, उपप्राचार्य प्रा. वैजनाथ चाटे, स्टाफ सेक्रेटरी डॉ. रमाकांत
तिडके, प्रबंधक शेखर शिंदे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कॉलेजच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. जी. सोनकांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. हंसराज जाधव तर आभार प्रा. कोकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय अधिकारी आर. एन. शिखत, कार्यालयीन अधीक्षक इम्रान पठाण, डॉ. एम. एन. करे, डॉ. अर्जुन मोरे, प्रा. रविचंद्र अंधोरीकर, प्रा. जयश्री गायकवाड, प्रा. नूतन जोनवाल, डॉ. नेहा अहुजा, कोष्टी, चाबुकस्वार इत्यादींनी परिश्रम घेतले.













