लाखो कर्करोग रुग्णांचा वनवास संपवला : डॉ. सुक्रे
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): १४ वर्ष म्हटले की आपल्याला प्रभू श्रीरामाचा वनवास आठवतो. मात्र, हजारो रुग्णांच्या नशिबी आलेला कर्करोगाचा वनवास मुक्त करून त्यांना रामराज्यात परत आणण्याचे कार्य शासकीय कर्करोग रुग्णालयाने केले आहे. २०१२ मध्ये लावलेल्या या रोपट्याने आता वटवृक्षाकडे वाटचाल केली असून, यासाठी हजारो हातांनी परिश्रम घेत आरोग्यसेवा दिली आहे. यामध्ये विशेष कार्य अधिकारी यांनी पायाभरणीपासून
ते रुग्णालयाच्या कळसापर्यंत स्वतः उभे राहून काम करून घेतल्याने आज हा डौलारा उभा असल्याची भावना डॉ. सुक्रे यांनी व्यक्त केली.
अधिष्ठाता सुक्रे यांनी सांगितले की, घाटी ही मातृसंस्था असली तरी कर्करोग रुग्णालयाने आपली राज्यभरात नव्हे तर देशात ओळख निर्माण केली आहे. पाच लाखापर्यंत रुग्णतपासणीचा आकडा हे त्याचे द्योतक आहे. अध्यक्षीय समारोप विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी केले. त्यांनी कर्करोग रुग्णालयातील सर्व अधिकारी
आजाराला घाबरू नका
कर्करोग या दुर्धर आजारावर उपचार घेवून विजय प्राप्त केलेल्या बालकर्करोग रुगण, स्त्री कर्करोग रुग्ण, पुरुष कर्करोगरुग्ण यांनी कर्करोग या आजाराला घाबरून न जाता आजारापासुन मुक्त होण्यासाठी दिलेली झुंज याबाबत माहितीपर मनोगत व्यक्त केले.
व कर्मचारी हे एक टिम म्हणुन काम करत असुन, कर्करोग रुग्णालय हे विविध सोई-सुविधायुक्त रुग्णालय असुन प्रगती करत असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. ऋषिकेश खाडीलकर यांनी केले. स्त्री कर्करोग विभागप्रमुख डॉ. अर्चना राठोड यांनी कर्करोगाबाबत जनजागृती, आधुनिक उपचार पध्दती याबाबत मार्गदर्शन केले. अधिष्ठाता, डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते,
किरणोपचारशास्त्र विभागाअंतर्गत हॉस्पीटल बेस्ड कॅन्सर रजिस्ट्रा या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. शेषराव कांबळे व अधिपरिचारिका प्रियंका बर्वे यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ. कनिज फातिमा यांनी केले. याप्रसंगी, डॉ. दर्पण जक्कल, वैद्यकीय अधिक्षक, डॉ. अंजली वासडीकर, डॉ. आदिती लिंगायत, डॉ. बालाजी शेवाळकर डॉ. वरुडकर आदी उपस्थित होते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













