अंधारी गावात शेतामधील गांजाची झाडे जप्त

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : अंधारी येथे शेतामधील गांजाची लावलेली आठ किलो वजनाची झाडे सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी पकडली ही कारवाई बुधवारी संध्याकाळी करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या तरुणाचे नाव अक्षय कैलास पांडव असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाची नाव याप्रकरणी या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे आरोपीच्या शेतातील गट नंबर ११ ३७ मध्ये गांजाची झाडे लावली असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारे पोलिसांनी शेतामध्ये छापा मारून गांजाची झाडे जप्त केली. त्यात सुमारे ४२ हजार किमतीची आठ किलो गांजाची झाडे मिळाली असून पोलिसांनी ताब्यात घेतले. 

आहे या कारवाईमुळे गावात हांहाकार उडाला ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे हवालदार येतीन कुलकर्णी दादाराव पवार संजय आगे रवींद्र काकडे रमेश व्यवहारे यांनी केली आहे.