जुन्या वादातून कारचालकाचे अपहरण करून मारहाण

Foto


छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पैशांच्या देवाणघेवाणीच्या जुन्या वादातून बिडकीन येथील खाजगी चालक बाळासाहेब हापसे (३५) यांचे कारमधून अपहरण करून मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी धामोरी बुद्रुक शिवारात घडली.
फिर्यादीनुसार, बाळासाहेब हे दुचाकीने मूळ गावाहून वाळूजकडे येत असताना, आरोपी संकेत भानुदास चव्हाण (रा. नेवासा) आणि त्याच्या तीन साथीदारांनी विनाक्रमांकाच्या कारने त्यांचा पाठलाग केला. धामोरी गावाजवळ आरोपींनी दुचाकीला धडक देऊन बाळासाहेबांना खाली पाडले आणि जबरदस्तीने कारमध्ये कोंबून त्यांचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी त्यांना गंगापूर-लासूर रस्त्यावरील
जुन्या व्यवहारातून वैमनस्य
बाळासाहेब मूळचे नेवासा तालुक्यातील रहिवासी असून चार वर्षांपासून बिडकीन येथे राहतात. मंगळवारी ते मूळ गावी गेले होते. बाळासाहेब व संकेतमध्ये देवाणघेवाणीच्या व्यवहारातून जुना वाद होता. दोघांविरोधात आधीच परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे दाखल आहेत.
एका निर्जनस्थळी नेऊन लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्‌यांनी बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांना लासूर स्टेशन परिसरात सोडून पसार झाले. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास फौजदार रमेश राठोड करीत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions