खतांची कोणतीही टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी : आ. अब्दुल सत्तार

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी), कृषी विभागाने प्रमाणित बियाणे व खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा तसेच खतांची कोणतीही टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे श आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले. 

तसेच चढ्या दराने खत व बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर आणि बोगस साहित्य विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी टास्क फोर्स तयार करावे, पात्र शेतकऱ्यांना निर्धारित वेळेत पीक कर्ज देवून शेतकऱ्यांची कोठेही अडवणूक पिळवणूक होणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्या अशा स्पष्ट सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत. 

येथील नगर परिषदेच्या सभागृहात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व तालुकास्तरीय नियोजन व आढावा बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना संबोधित करतांना आमदार अब्दुल सत्तार यांनी वरील निर्देश दिले.

या बैठकीस नगराध्यक्ष अब्दुल समीर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार अंकिता ताकभाते, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव , गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, न. प. चे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, पोलीस जि.प. सदस्य देविदास पालोदकर सय्यद नासिर हुसेन, राजू बाबा काळे, कृउबा समितीचे संचालक सतीश ताठे, जयराम चिंचपुरे निरीक्षक शेषराव उदार, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास निर्देदाभाडे, उपसभापती संदीप राऊत, नानासाहेब रहाटे, भावराव पा. लोखंडे, पं. स. सदस्य शेख सलीम, समी चाउस, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र पाटील, संचालक राजेंद्र ठोंबरे, शंकरराव खांडवे, सयाजीराव वाघ, माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा, माजी सभापती रामदास पालोदकर, संजय डमाळे, दुर्गाबाई पवार, सुदर्शन अग्रवाल, मनोज झंवर, जलसंधारण अधिकारी राजधर दांडगे, जि. प. सिंचन विभागाच्या उपविभागीय अभियंता रुचिका घोगरे, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता अभय शेळके यांच्यासह न. प. तील शिवसेना गटनेता सुधाकर पाटील, नगरसेवक सिद्धेश्वर आहेर आसिफ बागवान, शेख इम्रान, अशोक बनसोड, सत्तार हुसेन, सिद्धेश्वर आहेर, डॉ. फेरोज खान, बबलू पठाण, शेख सलीम हुसेन आदिंसह शासनाच्या विविध विभागाचे विभागप्रमुख, कर्मचारी,शेतकरी उपस्थित होते.