क्रांती चौक पोलिसांनी केली अटक
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): खडकेश्वर येथील खाजगी रुग्णालयामध्ये अॅडमिट असलेल्या ८० वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ५ तोळ्यांचे मंगळसूत्र चोरीला गेले होते. क्रांती चौक पोलिसांनी संशयावरून चौकशी करून केअर टेकर महिलेला अटक केली. तिनेच हे मंगळसूत्र चोरून घरात डब्यामध्ये ठेवल्याचे तपासात उघड झाले. चोरलेले मंगळसूत्र जप्त करण्यात आले. शुक्रवारी (दि. १२) ही कारवाई करण्यात आली.
सिंधू रमेशलाल देवतवाल (४२, रा. पदमपुरा) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी दिली. निराला बाजार येथील रॉयल रेसिडन्सीमध्ये राहणारे व्यावसायिक साहिल दिलीप चितलांगे (३३) यांनी फिर्याद
दिली. त्यांच्या आजी वासंती रामगोपाल चितलांगे (८०) यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्यांना ४ जून रोजी नागेश्वरवाडी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. तेव्हा त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेले होते.
या प्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. चोरीचा तपास सुरु असताना संशयावरून पोलिसांनी केअर टेकर म्हणून नेमलेल्या सिंधू देवतवाल हिची चौकशी केली. तेव्हा तिने मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी तिला अटक करून तिच्याकडून चोरलेले मंगळसूत्र हस्तगत केले. ही कारवाई उपनिरीक्षक सहायक फौजदार बाळू जाधव, पायल कांबळे आदींच्या पथकाने केली. उत्तम जाधव,
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















