पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आवाहनाला जिल्ह्यातून प्रतिसाद
गणेश उत्सवात सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना न करता जमा झालेल्या वर्गणीतून सामाजिक उपक्रम राबवावे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आवाहनाला जिल्ह्यातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यातून विविध गावातील 39 मंडळांनी प्रतिष्ठापना न करण्याचे लेखी स्वरूपात दिले आहे.
सध्या कोरोनाची महामारीने सर्वच त्रस्त आहे.याच पार्श्वभूमीवर काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढू नये या साठी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सार्वजनिक मंडळांना आवाहन केले होते.या आवाहनाला जिल्हयातील विविध 39 गावातून सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार नसल्याचे लेखी स्वरूपात संबंधित ठाण्यात देण्यात आले आहे.या मध्ये कन्नड,हातनूर,नागद, चापाणेर, आदी गावांचा समावेश आहे. तर अनेक मंडळे जमा झालेल्या वर्गणीतून मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात येणार आहे तर गंगापूर येथील शासकीय रुग्णालयात आवश्यक साहित्य देण्यात येणार आहे. इतर ही सार्वजनिक मंडळानी अशाच प्रकारे गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा न करता घरात सध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असे आव्हान अधीक्षक पाटील यांनी केला आहे.