विजय सायकल स्टोअर्सच्या मालकावर गुन्हा दाखल

Foto
सायकलसोबत स्मार्ट वॉचच्या ऑफरचा गंडा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): गणेशोत्सवानिमित्त सायकल खरेदीवर स्मार्ट वॉच, हेल्मेट आणि एअर पंप मोफत देण्याचे आमिष दाखवत पैठण गेट येथील विजय सायकल स्टोअर्सच्या मालकाने प्राध्यापकासह १९ ग्राहकांना ८० हजार ५०० रुपयांचा गंडा घातला. क्रांती विजय देशमुख (४०, रा. पैठण गेट) असे गुन्हा दाखल झालेल्या सायकल दुकान मालकाचे नाव असून त्याच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.६) गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी प्रा. प्रताप जिजासाहेब काशीद (४४, रा. गजानन नगरी, ईटखेडा, पैठण रोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ सप्टेंबर रोजी मुलीसोबत पैठण गेट येथील विजय सायकल स्टोअर्समध्ये सायकल खरेदीसाठी गेले होते. दुकान मालक क्रांती देशमुख याने गणेशोत्सवानिमित्त ऑफर सुरू असून सायकलसोबत हेल्मेट, स्मार्ट वॉच आणि हवा भरण्याचा पंप गिफ्ट मिळेल असे आमिष दाखवले. पूर्ण रक्कम भरून बुकिंग करण्याचे सांगून काशीद यांनी ३ हजार ५०० रुपये गुगल-पे द्वारे देशमुख याच्या खात्यावर पाठवले. काशीद दुकानात गेले व इतरांनाही अशीच उडवाउडवीची उत्तरे त्याने दिली.
१९ जणांना गंडा
देशमुख याने प्रा. काशीद यांच्यासह किरण नगरकर, जीवन साबळे, शिल्पा रेंगडे, देव अंबेकर, करण घनसावंत, आशिष पठे, ज्योती धुळे, रुषीकेश घुगे आर्दीसह एकूण १९ ग्राहकांकडून प्रत्येकी २ हजार ते ८ हजार ५०० रुपयांपर्यंतची रक्कम बुकिंगपोटी उकळल्याचे स्पष्ट झाले. या सर्वांना ८० हजार ५०० रुपये घेऊनही सायकली दिल्या नाहीत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions