नाथ सागर जलाशयावर विनापरवाना ड्रोन उडविले गुन्हा दाखल

Foto
पैठण (प्रतिनिधी)  : नाथसागर जलाशय हे नो ड्रोन झोन असताना सुद्धा विनापरवाना ड्रोन उडवून व्हिडिओ चित्रीकरण केले. ते सोशल सोशल मीडिया प्लॉट फॉर्म मनोज देहाडे या खात्यावरून सोशल मीडियावर प्रसारित केले. असल्याने दिनकर शिवाजी गोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक, दहशतवाद विरोधी शाखा, छत्रपती संभाजी नगर यांच्या फिर्यादीवरून मनोज राजेंद्र देहाडे २६ राहणार म्हाडा कॉलनी पडेगाव छत्रपती संभाजी नगर याच्या विरुद्ध पोलीस हेडकॉन्स्टेबल चेडे यांनी गु. र.११०/२०२६ कलम २२३ भारतीय न्याय संहिता सह कलम १० वायुमान अधिनियम १९३४ व ड्रोन अधिनियम २०२१ चे नियम २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जिवडे हे करीत आहे.