गंगापूरात ६ हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल

Foto
१२ घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा विभागाकडून जप्त

गंगापूर, शहरातील व्यावसायिकांकडून गॅस सिलेंडरचा (प्रतिनिधी) हॉटेल घरगुती गैरवापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुरवठा विभागाने केलेल्या तपासणीत सहा हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण १२ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.

नायब तहसीलदार (पुरवठा विभाग) सचिन अंबादासराव वाघमारे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली. वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ ते ६ वाजेदरम्यान गंगापूर शहरातील विविध हॉटेलमध्ये गॅस सिलेंडर तपासणी मोहीम राबविण्यात आली. या पथकात परीविक्षाधीन तहसीलदार सागर वाघमारे, पुरवठा निरीक्षक मिनल पवार, महसूल सहाय्यक सर्वेश भाले, विजय भंडारे तसेच पुरवठा विभागाचे इतर कर्मचारी सहभागी होते. तपासणीदरम्यान व्यावसायिक गॅस वापरण्याची परवानगी असतानाही काही हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचे आढळून आले. 

यामध्ये विशाल दारुंटे (हॉटेल गुरुमाऊली, लासूर नाका), बेबीताई घेगडे (हॉटेल ज्ञानेश्वर, वैजापूर रोड), हॉटेल ग्रॅज्युएट (मालकाचे नाव अज्ञात), बागवान फारुख (जय भवानी टी हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज चौक) तसेच रामेश्वर सोळंके व दिलीप भाटी (हॉटेल बालाजी मिठाई भंडार) यांचा समावेश आहे. 

तपासणीदरम्यान या हॉटेलमधून एकूण १२ घरगुती गॅस सिलेंडर आढळून आले. त्यांचा जप्ती पंचनामा करून सिलेंडर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात जमा करण्यात आले आहेत. या प्रकरणी संबंधित हॉटेल व्यावसायिकांविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८७ अन्वये गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.