महिला शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा; आरोपी फरार

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) पोलीस उपायुक्त कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत असलेल्या एका ग्रेड पोलीस उपनिरीक्षकाने (झङख) विवाहित महिला शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच संबंधित पोलीस अधिकारी फरार झाला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. हरीश माधवराव खटावकर (वय ५३) असे गुन्हा
दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या
नस ठाणे जवाहर नगर
माहितीनुसार, पीडित महिला आणि संशयित आरोपी खटावकर यांची गेल्या ४ वर्षांपासून
ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत खटावकर याने मे २०२५ ते १५ जुलै २०२६ दरम्यान पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. घराचे इंटेरियर दाखवण्याच्या व हॉटेलमध्ये काम असल्याच्या बहाण्याने त्याने पीडितेला बोलावून तिचे शोषण केले. पीडितेने याला विरोध केला असता, तिच्या पतीला सांगून बदनामी करण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा खटावकर पीडितेच्या मोबाईलवर
मेसेज करत असल्याची माहिती तिच्या पतीला मिळाली. पतीने या संदर्भात जाब विचारला असता खटावकर याने उद्दामपणाची उत्तरे दिली. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास खटावकर थेट पीडितेच्या घरी पोहोचला आणि तिला बळजबरीने कारमध्ये बसवून नेले. कारमध्ये त्याने पीडितेला मारहाण केली आणि रात्री १० वाजेच्या सुमारास तिचा मोबाईल हिसकावून घेत तिला दूध डेअरी चौकात उतरवून तो पसार झाला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
११ वर्षांपूर्वीही झाली होती निलंबनाची कारवाई
आरोपी हरीश खटावकर हा १९९३ मध्ये पोलीस दलात भरती झाला होता. सध्या तो परिमंडळ २ कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत आहे. खटावकरचा पूर्वेतिहासही वादग्रस्त राहिला असून, ११ वर्षांपूर्वी एका महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
पोलीस आयुक्तांकडे अहवाल सादर
गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी फरार झाला आहे. उपायुक्त कार्यालयाने या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे पाठवला असून, आरोपीवर लवकरच कडक कायदेशीर आणि खात्यांतर्गत निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
Sah