दोषी अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करणार

Foto
महसूलमंत्री बावनकुळे यांचा इशारा : जमिनींच्या घोटाळ्यांची एसआयटीमार्फत चौकशी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): इनामी आणि वर्ग-२ जमिनींचा शर्तभंग करून बेकायदेशीर प्लॉटिंगद्वारे नागरिकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणांची आता विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जाणार आहे. यासाठी याच महिन्यात पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच, निर्धारित कार्यपद्धतीला (एसओपी) डावलून नव्या तुकड्यांची नोंदणी करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले
जातील, असा इशारा त्यांनी दिला. राज्य शासनाच्या निर्देशानुसार महसूल विभागाकडून सरकारी जमिनींचा शोध सुरू आहे. या मोहिमेदरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात इनामी आणि वर्ग
२ जमिनींवर परवानगीविना प्लॉटिंग करून त्यांची बेकायदेशीर विक्री केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे, काही ठिकाणी प्लॉटची विक्री थेट बाँडवर करण्यात आल्याचेही उघड झाले
आहे. या अनधिकृत प्लॉटिंगविरोधात महापालिकेने कारवाई करत काही ठिकाणी अतिक्रमणे हटवली, तर काही प्रकरणांत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. दुष्काळी दौऱ्यानिमित्त छत्रपती
शेकटा मंडळात पिकांची पाहणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेकटा मंडळातील गाढे जळगाव येथे मंजूर उस्मान खान पठाण या शेतकऱ्याच्या शेतात पाहणी केली. सोयाबीन पिकाची दुरवस्था झाली असून पाण्याअभावी पीक करपून गेली. शासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून संपूर्ण यंत्रणा आता पंचनामे करीत आहे. अचूक पंचनामे करून शेतकऱ्यांना अधिक अधिक मोबदला कसा देता येईल, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना मोबदला मिळावा यासाठीही शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असे बावनकुळे यांनी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले.
संभाजीनगरमध्ये आलेल्या बावनकुळे यांनी नागरिकांची निवेदने स्वीकारली. यावेळी जमीन घोटाळ्यांबाबतच्या तक्रारींचे प्रमाण लक्षणीय असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतर
करण्यासंदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडून कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकीकडे जमीन घोटाळ्यांच्या चौकशीची तयारी सुरू झाली असताना, दुसरीकडे वर्ग-२ जमिनींच्या हस्तांतरणासंदर्भातील नियमांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions