सुजात आंबेडकर : आरक्षण हटाव आंदोलनावरून तरुणाईशी संवाद
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): देशात जातीयवाद अस्तित्वात असेपर्यंत आरक्षणाची गरज राहणार आहे. जातीयवादाविरोधातील लढ्यात आरक्षण हेच एक प्रभावी साधन आहे. आरक्षण बंद केले तरी समाजातील जातीयवाद संपणार नाही. त्यामुळे या संघर्षात युवा पिढी एकटी नाही, आम्ही तिच्यासोबत आहोत, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवारी (दि. २९) संत एकनाथ रंगमंदिरात 'जय भीम, जेन-झी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुजात आंबेडकर यांनी महाविद्यालयीन तरुणांशी शिक्षण, रोजगार, आरक्षण तसेच सामाजिक व राजकीय प्रश्नांवर संवाद साधला.
मुंबई आयआयटीचा विद्यार्थी साहिल वाकोडे याला श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर देशभरातील तरुणाई रस्त्यावर उतरली. मात्र, या आंदोलनानंतर अचानक 'आरक्षण हटाव' आंदोलन सुरू झाले, असा दावा आंबेडकर यांनी केला. आजही दलित आणि ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना जातीय आधारावर हिणवले जाते. दलित समाजातील व्यक्ती प्रगती करून
संपत्तीतील असमानतेवरही सवाल
देशातील संपत्ती आणि संधींच्या वाटपातील विषमतेकडे लक्ष वेधताना आंबेडकर यांनी उच्चवर्णीय समाजाच्या प्रतिनिधित्वाबाबत विविध आकडे मांडले. देशाच्या लोकसंख्येत सुमारे २८ टक्के असलेल्या उच्चवर्णीयांकडे देशातील ५५ टक्के संपत्ती असल्याचा दावा त्यांनी केला. कॉर्पोरेट कंपन्या, केंद्रीय विद्यापीठे आणि माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधित्वाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सफाई कामगारांच्या क्षेत्रात दलित समाजाचे प्रमाण मोठे असताना संपत्ती, शिक्षण आणि प्रतिष्ठेच्या क्षेत्रातील असमानतेवर पुरेशी चर्चा होत नसल्याचे ते म्हणाले.
इतरांच्या बरोबरीने येईल, अशी भीती काहींना वाटते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आरक्षण हे गरीब हटावाचे धोरण नसून सामाजिक समतेचे साधन आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करताना
समाजातील या विषमतेचीही वस्तुनिष्ठ मांडणी झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात व्हीआयपी डान्स साइडचे रॅम्प साँग सादर करण्यात आले. उत्कर्षा यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













