सिल्लोड (प्रतिनिधी) माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांनी येथील इंदिरा नगर झोपडपट्टीतील कुटुंबासोबत दिवाळी सण साजरा केला. अब्दुल समीर यांनी या भागातील
रहिवासीयांना फराळाचे वाटप देखील केले. इंदिरा नगर भागात वडार, पारधी, शिक्कलकर अशा भटक्या जमातीचे लोक राहतात. दरवर्षी अब्दुल समीर या ठिकाणी येऊन दिवाळी सण साजरा करतात.
यावेळी अब्दुल समीर यांनी येथील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून त्या सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने येथे करण्यात आलेली व प्रस्तावित विकास कामांची त्यांनी माहिती दिली. येथिल रहिवासी यांच्या वतीने अब्दुल समीर यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना अब्दुल समीर यांनी आभार मानत उपस्थितांना दीपावली, पाडवा व भाऊबीज निमित्त शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कृउबा समितीचे संचालक नंदकिशोर सहारे, माजी नगरसेवक विठ्ठल सपकाळ, अकील वसईकर, शंकरराव खांडवे, सत्तार हुसेन, बबलू पठाण, अकील देशमुख, बॉबी चौधरी यांच्यासह शिवराम टापरे, संजय शिंदे, कालूसिंग टाक, गंगाधर शिंदे, गोविंदा कडमीचे, अजयसिंग टाक, शिवाजी कडमीचे, साहेबराव शिंदे, सुनील कडमीचे आदींची उपस्थिती होती.
















