खुलताबाद, (प्रतिनिधी) : बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष सुकेश झंवर यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त गल्लेबोरगाव येथील विठ्ठल रुखुमाई मंदिरास भाविकांच्या सोयीसाठी सिमेंट बेंच भेट देण्यात आले.
सहकार क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत, आर्थिक व सोशियल बँकिंग ची यशस्वी परंपरा जोपसणाऱ्या बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष सुकेश झंवर यांच्या सुवर्णं मोहत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून हे बेंच भेट देण्यात आले.
सरपंच विशाल खोसरे यांच्या हस्ते आसन व्यवस्थेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ह. भ. प. उत्तमराव बढे, जगन्नाथ खोसरे, ह. भ. प. बाळकृष्ण महाराज, रामदास चंद्रटीके, जगदीश चंद्रटीके, कल्याण आहेर, धर्मसिंग बारवाल, संभाजी मोहिते, पंकज जैन, दिलीप बेडवाल, सुभाष चव्हाण, रायभान कहऱ्हाळे, अशोकराव भागवत, रमनलाल
पंजाबी, लक्ष्मण चंद्रटीके, शंकर मिसाळ, रावसाहेब खोसरे, प्रमोदशेठ विसपुते, रामचंद्र बाविस्कर, प्रवीणकुमार देवडा, प्रकाश भागवत, ज्ञानेश्वर माऊली बोर्डे, शाखा व्यवस्थापक गणेश फुसे, शाखा व्यवस्थापक संजय वन्हाडे शाखा व्यवस्थापक संजय पाटील कर्मचारी. नंदकिशोर थोरात, राहुल साळुंके, निखिल खरे, अभिषेक मोतीगे, नारायण राऊत, शंकर इतवारे, शरद बरगळ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
















