अभिनेत्री नम्रता संभेराव, पार्श्वगायक रवींद्र खोमणे यांची उपस्थिती
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): गेल्या तीन दिवसापासून तरुणाईच्या उपस्थिती बहरून गेलेल्या केंद्रीय युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप झाला. अभिनेत्री नम्रता संभेराव व पार्श्वगायक रवींद्र खोमणे यांनी सादर केलेल्या गाणी व डायलॉगबाजीने युवा कलावंतांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप विद्यापीठाच्या नाट्यगृहात बुधवारी (दि.७) झाला. कुलगुरु डॉ.
विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभास 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेराव व विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा पार्श्वगायक रवींद्र खोमने यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी प्रकुलगुरु डॉ. प्रवीण वक्ते, व्यवस्थापन परिषद सदस्य अॅड. दत्तात्रय भांगे, डॉ. अपर्णा पाटील, कुलसचिव डॉ. संजय कवडे, संचालक डॉ. कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवात चार रंगमंचावर २८
कलाप्रकार सादर झाले. विजेत्या संघाना पारितोषिक वितरण करण्यात आले. संघ प्रमुख डॉ. रवींद्र भोरे, कलावंत पुजा हादगुले व आदित्य दराडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी डॉ. गणेश शिंदे यांनी दिग्दर्शत केलेली ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. डॉ. प्रेषित रुद्रवार यांनी सूत्रसंचालन तर डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले. तर पारितोषिकांचे वाचन डॉ. किशोर शिरसाठ व डॉ. समाधान इंगळे यांनी केले.
आपली भाषा, आपला अभिमान : नम्रता संभेराव
आपण ज्या भूमीतून आलो ती माती, संस्कृती आणि भाषा याचा अभिमान बाळगा. तसेच बोलतानाही नियमित त्याच भाषेचा वापर करा. आपली भाषा-हाच आपला अभिमान आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री नम्रता संभेराव यांनी केले. आपण नाटयशास्त्र केले नाही मात्र युवक महोत्सव आणि कला, सांस्कृतिक स्पर्धामधून जडण घडण झाली, असेही त्यांनी सांगितले.
विद्यापीठाची विजेतेपदाची
केंद्रीय युवा महोत्सव - २०२६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने केंद्रीय युवक महोत्सवात सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद खेचून आणले. विजेतेपदासह दोन गटातील चार चषक व १६ कलाप्रकारात पारितोषिके मिळवून या संघाने हॅटट्रिक केली. महोत्सवात चार रंगमंचावर २८ कलाप्रकार सादर झाले. विजेत्या संघाना पारितोषिक वितरण करण्यात आले. ललित कला व नाटयगटातील चषकासह जगन्नाथराव नागपुडे स्मृती चषक व
डॉ. दिलीप बडे चषकही विद्यापीठाच्या संघाने जिंकला. या संघाने २०२४, २०२५ व २०२६ अशी सलग तीन वर्षे विजेतेपद जिंकून हॅटट्रिक केली आहे. या कलावंतांना ललित कला विभागप्रमुख डॉ. शिरीष अंबेकर, नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. वैशाली बोदेले, संघप्रमुख डॉ. गणेश शिंदे, सांस्कृतिक समन्वयक गौतम सोनवणे व डॉ. निखिल राजवर्धन यांचे मार्गदर्शन लाभले. १५ कलाप्रकारात ३५ कलावंत सहभागी झाले.
https://epap Powered By: Vrudhee Solutions















