आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी अमित शहांना अशी लाथ मारली असती की अमित शहा मुंबईत परत आले देखील नसते, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अमित शहा आणि शिवसेनेवर तोफ डागली आहे. भाजपच्या एका मेळाव्यात शहांनी ‘पटक देंगे’ असे विधान केले होते. त्यांच्या याच विधानावर भुजबळांनी त्यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेला आज सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते.
निर्धार परिवर्तन यात्रेच्या
माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते
छगन भुजबळ यांनी राज्य सरकार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली.
युती करायची तर करा, लोकांना का फसवता? असा
सवाल भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. पुढे बोलताना त्यांनी राफेल वरुन
त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. अनिल अंबानी यांनी खेळण्यातले विमानही कधी
बनवले नाही आणि त्यांना कंत्राट दिले असा टोला त्यांनी लगावला.