जिल्ह्यातील सरपंचांशी मुख्यमंत्री फडणवीस आज साधणार संवाद !

Foto

औरंगाबाद: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावाच्या सरपंचांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळपासूनच धावपळ सुरू होती.

जिल्ह्यात भयंकर दुष्काळी स्थिती आहे. मराठवाड्यात सर्वाधिक टँकर औरंगाबाद जिल्ह्यात सुरू आहेत. ग्रामीण भागात तर परिस्थिती अधिकच बिकट आहे. आचार संहिता शिथील करून आयोगाने दुष्काळी कामांचा अडसर दूर केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात दुष्काळाची पाहणी करीत आहेत. प्रशासन वेगाने कामाला लागावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी २ च्या सुमारास मोबाईल कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकारी तसेच सरपंचांशी थेट संवाद साधणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्स हॉल मध्ये तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस मोबाईल कॉन्फरन्सिंगद्वारे सरपंचांशी मोबाईल व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधतील अशी माहिती सूत्रांनी दिली.