बालक हे राष्ट्राचे भविष्य : भास्कर कुलकर्णी

Foto
पैठण, (प्रतिनिधी) आर्य चाणक्य प्राथमिक विद्या मंदिर मध्ये बाल दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले असून या कार्यक्रमास माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्य आर्य चाणक्य प्राथमिक विद्या मंदिर मध्ये बालदिन व माजी विद्यार्थी संघ स्थापना मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भास्करराव कुलकर्णी उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून माजी विद्यार्थी डॉ. दिव्या नरोटे, अॅड समृद्धी भागवत, इंजि. सुमित शिंदे, उद्योजक योगेश धुपे, सुप्रसिद्ध व्यापारी गणराज दहिवाळ, वैष्णवी शिसोदे हे विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात पंडित नेहरू, बिरसा मुंडा, भारत माता प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी अॅड समृध्दी भागवत व डॉ दिव्या नरोटे यांनी भाषणात जुन्या गोष्टींची आठवण करून देत शाळेतील मनोरंजन गोष्टी सांगितल्या व शाळेचे महत्त्व सांगितले. सुदाम पोल्हारे यांनी उपस्थित सर्वांना बालदिनाचे महत्त्व सांगितले. प्रत्येक मूल हे देवाचे देणं आहे, त्यांच्या चेह-यावरचे हास्य कायम ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.

 विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर सदगण आदर आणि सहकार्य यांचा स्वीकार करावा असे सांगितले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक भास्करराव कुलकर्णी यांनी अध्यक्षीय समारोप करताना बालदिनाच्या शुभेच्छा देत बालक हे राष्ट्राचे भविष्य आहेत. त्यांच्या शिक्षण संस्कार आणि विकासासाठी प्रत्येक शिक्षकाने जबाबदारीने प्रयत्न करणे आवश्यक आहे असे वक्तव्य केले आणि पंडित नेहरूंचे बालप्रेम, त्यांचे विचार आणि बालकांविषयी असलेले प्रेमळ दृष्टीकोन याबद्दल सर्वांना प्रेरित केले. सुत्रसंचालन सर्फराज अंबेकर यांनी तर आभार प्रदर्शन गितांजली शेवतेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.