डॉ. विशाल तायडे यांच्या बाल कादंबरीस बालसाहित्य पुरस्कार

Foto
२१ फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा

सिल्लोड, (प्रतिनिधी) सुप्रसिध्द बालसाहित्यिक डॉ. विशाल तायडे यांच्या ढ या बालकादंबरीस शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा संदीप दळवी बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृह, मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात येईल. 

डॉ. विशाल तायडे हे राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे वरिष्ठ अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मैत्री छोट्या राजूची मोठी गोष्ट राजू आणि गोलू प्राण्यांचा व्हॉट्सअॅप आणि इतर गोष्टी बेस्ट फ्रेंड प्राणियों का व्हॉटफ साँप और अन्य कथाएँफ आदी बालसाहित्य निर्मिती केली आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून संदर्भपुस्तके व पूरक वाचन साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. 

त्यांच्या साहित्यिक कार्याला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांनी अनेक
साहित्य संमेलनांत सक्रिय सहभाग नोंदविला असून २०२६ च्या जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आयोजित पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. त्यांच्या या सर्वांगीण साहित्यिक योगदानाचा विचार करून ङ्गढफ या कादंबरीस सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

या साहित्यिक यशाबद्दल महाराष्ट्र शैक्षणिक प्रशासन व नियोजन संस्थेचे राज्य संचालक प्रकाश मुकुंद, राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्थेच्या संचालिक डॉ. शैलजा दराडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे डॉ. आर. डी. कांबळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, डॉ. संजय गायकवाड, डॉ. हबीब भंडारे, सुनील डोके, आशाताई डांगे, प्रा. जी. आर. तायडे, उत्तम बावस्कर, डॉ. संजय येवते, डॉ. रवी जाधव, डॉ. मंजुषा क्षीरसागर, डॉ. सुनीता राठोड, नारायण पडूळ, रायभान जाधव आदींनी अभिनंदन केले आहे.