सिल्लोड, (प्रतिनिधी) पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक आदर्श शाळा केहऱ्हाळा येथे दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ ते १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत बालदिन अभिव्यक्ती सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यात आला. विद्यार्थ्यांनी बाल सभा आयोजित करून आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला.
नाट्यजागर या अंतर्गत विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा हा मोलाचा संदेश सर्वांना दिला.
सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जवाहरलाल नेहरू यांची माहिती भाषणाद्वारे सर्वांना दिली. यासोबतच रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, फुलांपासून सजावट, चित्रकला या स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले. या संपूर्ण सप्ताहात शाळेचे मुख्याध्यापक श्री रामचंद्र मोरे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
सप्ताह यशस्वी करण्यासाठी सोमनाथ राणे, शेख चांद, श्रीनिवास जाधव, तेजस क्षीरसागर, महेंद्र सूर्यवंशी, रमेश पवार, संभाजी पाटील सुरेंद्र बबीरवाल शेख नासिर, जुबेर कुरेशी, शेख कलिमुद्दीन महानंदा राजपूत, रत्नकला इंगळे, वंदना साबळे, विभा मेश्राम, कविता तेली, पूनम सोनवणे, सुनीता निंभोरे, सदानंदी दोडके, विद्या सरदार, स्वप्नजा पाटील, तहसीन शेख, मुकिता पठाण, शाजिया शेख, शाहीन परवीन, शीतल महाले, कमल पांढरे यांनी परिश्रम घेतले सर्व शिक्षकांच्या सहकार्यातून हा सप्ताह उत्साहात पार पडला. संचालन वंदना साबळे यांनी तर आभार पूनम सोनवणे यांनी मानले.












