औरंगाबाद- पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आज (ता.१४) सर्वत्र बालदिन उत्साहात साजरा करण्यात केला जातो. परंतु आजही शहरात सुमारे १ हजार बालक कचरा वेचतात, तर अनेक बालक शहरातील चौकांमध्ये भिक मागून आपले पोट भरतात. यांच्याकडे मात्र शासनाने दुर्लक्ष केलेले दिसत आहे.
बालदिनानिमित्त दै. ‘सांजवार्ता’ ने बालकामगार सल्लागार
मंडळाचे लक्ष्मण माने यांच्याशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही
१ हजार बालक कचरा वेचतात. तसेच त्यातील अनेक मुले व्यसानाधिनतेकडे वळाले आहेत.
व्हाईटनर, सिगारेटसारखे भयानक व्यसनाने ग्रासले आहेत.
तीन वर्षांपासून समितीची बैठक नाही
बालकल्याण सल्लागार समितीची तीन वर्षांपासून एकही बैठक झालेली
नाही. यावरुन शासन शाळाबाह्य मुले आणि इतर बालकांसाठी काय काम करते? हे स्पष्ट होत
आहे. शासन बालकांविषयी उदासिनच असल्याचे दिसते. तसेच चाईल्ड लाईन फक्त नावालाच
दिसते.
मोबाईलमध्ये अडकताय मुले
बाहेरील निराधार बालकांच्या समस्यांबरोबर इतर बालकांमध्येही
सध्या अनेक समस्या उद्भवताना दिसत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स साधनांमध्ये बालक अडकताना
दिसत आहेत. मोबाईलवर गेम खेळणे, गाणे एकणे यामुळे लहान बालकांच्या मानसिक
संतुलनावरही परिणाम होताना दिसत आहे.
शासनाने बालकांकडे लक्ष देण्याची गरज
कचरावेचक बालक असो अथवा बालकामगार बालक असो त्यासाठी
अभिरुचीवर्ग सुरु करावेत. बालकल्याण सल्लागार समितीची बैठक होऊन व्यसानाधिनतेकडे
वळालेल्या बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. तरच या
बालकांचे भवितव्य सुधारेल आणि खऱ्या अर्थाने बालदिन साजरा होईल.
लक्ष्मण माने (बालकल्याण सल्लागार मंडळ, अशासकीय सदस्य)













