वार्षिक स्नेहसंमेलनात चिमुकल्यांचे बहारदार सादरीकरण

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा कासोद ता. सिल्लोड येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले, चिमुकल्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करत, उपस्थितांचे मने जिंकली.

जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा कासोदच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन कसब चिमुकल्यांचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समिती सदस्य नारायण खोमणे, केंद्र प्रमुख राजु महाजन, केंद्रीय मुख्याध्यापक दिपक सोनवणे, सरपंच दत्तात्रय राकडे, उप सरपंच राहुल राकडे, संजय राकडे, धनजंय काटे, मथाजी
काकडे, जगदिश कदम, कृष्णा शेळके, ज्ञानेश्वर लांडगे, शिवा गौर, पत्रकार गणेश शेळके आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

चिमुकल्यांनी विविध गाण्यांवर पोषाख परिधान करून नृत्य केले. छत्रपती शिवाजी
महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुलेसह आदी राष्ट्रपुरुषांचे वेशषरिधान करून नाटिका सादर केले. विविध प्रकारची लोककलेचे बहारदार सादरीकरण करत उपस्थितांचे मने जिंकली. 

यात देश भक्ती गिते, लावणी, कोळी गित, लोकगित, शेतकरी गित, विनोदी गीतांवर चिमुकल्यांनी नृत्य सादर केले तसेच नारीशक्ती (महिला सक्षमीकरण), अंधश्रध्दा यावर समाजप्रबोधन नाटिका सादर करण्यात आल्या. महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षीका संगिता शिंदे, सारिका काळपांडे, भूषण घोटकर, काशिनाथ नेव्हारे आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन मुख्याध्यापक सुरेश देवरे, गंगाधर जगताप यांनी केले. या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.