वैजापूर, (प्रतिनिधी) : शहरामध्ये मंगळवारी रात्री पोलीस व चोरट्यांचा सिनेस्टाईल थरात पाहण्यास मिळाला - वैजापूर पोलिसांनी अनेक तास चोरट्यांचा पाठलाग करून दोन संशयतांना मध्यरात्री ताब्यात घेतले मोहम्मद कैफ नजमुद्दीन (रा. उलेटा. ता. फिरोजपूर, हरियाणा) आझाद इमू खान (रा. झारो कशी, हरियाणा) असे चोरट्यांचे चे नाव आहे.
वैजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यजित - ताईतवाले यांना गुप्त माहिती मिळाली की, स्टेशन रोड रस्त्यावरील भारतीय स्टेट बँक शाखेजवळ एक स्विफ्ट कार संशयितरित्या उभी आहे. त्यामुळे तात्काळ पोलीस निरीक्षक टाइतवाले यांनी वैजापूर गोपनीय शाखेचे ज्ञानेश्वर मेटे अविनाश भास्कर यांना चौकशी करण्यासाठी पाठवले. पण पोलिसांची चाहूल लागतात चोरटे तेथून पसार झाले. संशयतांनी आपली गाडी स्टेशन रोड रस्त्यावर पळवली पोलिसांनी दुचाकीवर त्यांचा पाठलाग सुरू केला. जरूर फाट्यावरती नागरिकांना गाड्या अडवण्यास सांगितले,
परंतु चोरट्यानी आपल्या गाड्या जीवनगंगा सोसायटीमध्ये वळवल्या. तेथील एका शेतामध्ये त्यांची गाडी फसल्याने चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. वैजापूर पोलिसांनी रात्रभर शोध घेऊन पहाटे चार वाजेच्या सुमारास तिडीशिवारातून दोन चोरांना ताब्यात घेतले अंधाराचा फायदा घेऊन तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले पुढील तपास वैजापूर पोलीस करत आहे.















