गंगापूर, (प्रतिनिधी) शहरामध्ये दिवाळीनिमीत्त दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नागरिकांनी याला खुप चांगला प्रतिसाद दिला. या वेळी राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या वेळी अर्जुन खोतकर म्हणाले की, तर माझ्यासारखे अनेक बाण संतोष कराळे यांच्या भात्यात असल्याचा उल्लेख केला. सासुरवाडीमध्ये अर्थात गंगापूरमध्ये कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त इतका वेळ थांबण्याचा हा माझा पहिला प्रसंग आहे.
एवढा मोठा सन्मान देखील पहिल्यांदाच झाल्याचा उल्लेख खोतकर यांनी केला. कमी वयात आमदार आणि मंत्री होणारे खोतकर हे त्यांच्या प्रदीर्घ व अनुभवी कारकीर्द आणि आक्रमक कार्यशैलीमुळे ते जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे संतोष कराळे यांनी सांगितले. येथे आयोजित कार्यक्रमात अर्जुन खोतकर व त्यांच्या पत्नी सीमा खोतकर यांच्या प्रगट मुलाखतीचे (पॉडकास्ट) आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तर देताना अर्जुन खोतकर म्हणाले की संतोष कराळे हे राज्याच्या धोरणनिर्मितीपासून ते सामाजिक उपक्रमांच्या अंमलबजावणीपर्यंत सक्रिय भूमिका बजावणारे दूरदृष्टीचे व्यक्तिमत्व आहेत,
राज्य शासनाच्या विविध धोरणांमध्ये त्यांनी दिलेला सल्ला, प्रशासनातील त्यांच्या कार्यशैलीचा प्रभाव, महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसह मातब्बर राजकारण्यांसाठी त्यांनी आखलेली रणनीती उल्लेखनीय आहे. कराळे यांच्या विचारसरणीचा आणि कामकाजाचा मी स्वतः जवळून अनुभव घेतला आहे. त्यांच्या अनेक निर्णायक प्रसंगांचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे त्यांच्या भात्यातील मी एक बाण आहे.
आणि असे अनेक सक्षम, कार्यक्षम बाण त्यांच्या भात्यात आहेत असे खोतकरांनी स्पष्ट केले. राजकीय क्षेत्रात दीर्घकाळ टिकून समाजासाठी काम करायचे असेल, तर सर्वप्रथम आपल्या कुटुंबाचे पाठबळ असणे आवश्यक असल्याचे देखील खोतकर म्हणाले. कैलास
सीमा कराळे यांच्या संकल्पनेतून दीपोत्सव
कार्यक्रमाचे आयोजक राज्य शासनाचे शासकीय धोरण सल्लागार व राजकीय रणनीतीकार संतोष पा. कराळे आणि त्यांच्या पत्नी सीमा कराळे यांच्या संकल्पनेतून हा दीपोत्सव साकारण्यात आला.
--- गंगापूरच्या इतिहासात अविस्मरणीय ठरला --
भव्य सजावट, पारंपरिक रोषणाई, आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा गंगापूरच्या इतिहासात अविस्मरणीय ठरला. या प्रसंगी शहरातील राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संतोष कराळे दांपत्याचे अभिनंदन केले.
संजय जाधव, किरण पाटील डोणगावकर, कृष्णा पाटील डोणगावकर, संतोष माने, संदीप दारुंटे, प्रदीप पाटील, नईम मन्सुरी, सिने कलावंत निशिगंधा वाड, हर्षदा खानविलकर, अशोक समर्थ, अशोक शिंदे, कुशल बद्रिके, प्रिया बेर्डे, हेमांगी कवी, तन्वी किशोर, अक्षता सावंत, मोहसीन चाऊस, सुवर्णा जाधव, संदेश गंगवाल, संतोष अंबिलवादे आणि यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.