औरंगाबाद : आजही शहरातील सातारा, देवळाई, हर्सूल, जाधववाडी या भागातील नागरिकांना पाणी, रस्ते या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. कर भरूनही पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
एकीकडे शहरात राजकीय नेते बॅनरवर लाखो रुपये खर्च करताना दिसतात. मात्र दुसरीकडे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याचा परिणाम काही भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सातारा, देवळाई, हर्सूल, जाधववाडी येथील नागरिक कर भरूनही पाण्याच्या समस्यांनी त्रस्त झाले आहेत. काही भागात तीन दिवसाला पाणी सोडतात तर काही भागात सात दिवसाला पाणी सोडण्यात येत आहे. सर्वच नागरिक कर भरतात. परंतु असा भेदभाव कशासाठी केला जात आहेे. असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. याशिवाय रस्तेही खराब झाले आहेत. जालना रोडला पर्यायी रस्ता कैलासनगर येथून करण्यात येणार होता. मात्र तेही काम रखडलेले आहे.
नागरिक उतरणार रस्त्यावर
करू भरूनही भागात पाणी मिळत नाही. रस्ते नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे, लागत आहे. या समस्या लवकर सुटल्या नाही तर काही भागातील नागरिक रस्त्यावर उतरून करणार, आंदोलनाचा पवित्रा घेणार आहेे.
बॅनरचा खर्च रस्त्यांवर करा
राज्य सरकारने शंभर कोटी रुपये रस्त्यासाठी मंजूर केले आहेत. मात्र अनेक रस्त्यांची दुरावस्था कायम आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनासाठी शंभर होल्डींग लावले जाणार आहे. त्यासाठी महानगरपालिका लाखो रुपये खर्च करणार आहे. बॅनरवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा रस्त्यावर खर्च करावे, असेही नागरिकांकडून बोलले जात आहे.