छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महेश नवमीच्या निमित्ताने मंगळवारी (दि.२३) सायंकाळी एन-१ सिडको येथील निर्मदेश्वर महादेव मंदिर येथून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी जय महेशच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
माहेश्वरी मंडळाच्या वतीने महेश नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. सकाळी ई-वाहन रॅली काढून महेश नवमीला सुरुवात झाली. सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शिव-पार्वती, गणपती, कार्तिकेय यांच्या सजीव देखाव्यांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी पथनाटयातून पालकांनी पाल्य आणि युवक-युवतींनी लग्न करतानाही कौटूंबिक संवाद जपावा असा संदेश दिला. यावेळी समाजबांधवांनी 'जय महेश.. जय महेशचा' जयघोष केला. यावेळी
क्रेझी बाईट येथे आईसक्रीमचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर मिरवणूकीत स्वच्छता मोहीम राबवून सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी देखाव्यातून पर्यावरण जनजागृती करण्यात आली. मिरवणुकीसाठी माहेश्वरी मंडळाचे
जय महेशचा जयघोष
अध्यक्ष सुनील मालाणी, सचिव अनिल बाहेती, सीए गोपाल जाजू, सीए अशोक राठी, रजत सोनी यांच्यासह प्रकल्प प्रमुख संजय मंत्री (ब्लुबेल), गोकुल लोहिया, सतीश लड्डा, ज्योती राठी, मिलन गांधींसह आदींनी सहकार्य केले.
▶ सिडको एन-१ येथील नर्मदेश्वर महादेव मंदिरापासून मिरवणूकीला प्रारंभ झाला. यावेळी बँडच्या गजरात महेश भगवंताची मूर्ती लक्ष वेधत होती. मुकुंदवाडीतील वारकरी वेशभूषेत महिला-पुरूष भजनी मंडळांनी टाळ घेऊन भजने गायली. यावेळी पाऊली खेळत पारंपरिकतेचे दर्शन घडविले. मिरवणूकीत भगवान शंकर (नेहा झंवर) आणि पार्वती (निकिता सोनी), गणपती (समर्थ तोतला), कार्तिकेय (शौर्या तोतला) यांनी लक्ष वेधले. गारखेडा प्रभागतर्फे विकसित भारताचा संदेश दिला. शोभायात्रा सागर रिसॉर्टमार्गे महेश भवन, चिकलठाणा मार्गे काढण्यात आली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions