कुठे पैसे वाटल्याचा तर कुठे बॅनर फाडल्याचा आरोप
सिल्लोड, (प्रतिनिधी): शहरात शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका आशा स्वयंसेविकेने मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप भाजपच्या प्रभाग क्रमांक ८ च्या उमेदवार रेखा भूमकर यांनी केला आहे. सिल्लोड शहरात भाजप शिवसेना यांच्यातील वाद आता विकोपाला गेला असून कुठे पैसे वाटल्याचा तर कुठे बॅनर फाडल्याचा आरोप एक मेकांवर केला जात आहे.
या प्रकरणी सिल्लोड येथील निवडणूक निर्वाचन अधिकारी निलेश अपार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. दोन महिला या घराघरात जाऊन मतदारांना अमिश दाखवून पैसे वाटप करत होती त्याना मी हटकले असता त्या महिलांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक महिला पळून गेली एका महिलेला आम्ही पकडले असता तिने एका घरात ६००० रुपये फेकून दिले तिच्या पर्स मध्ये शिंदेसेनेचे रुमाल व पैसे वाटप करण्यासाठीची मतदारांची यादी होती असे रेखा भूमकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीत तथ्य नाही :
सिल्लोड शहरात शाश्री कॉलनीत पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे मात्र आम्ही त्या महिलेची चौकशी केली असता ती आशा स्वयंम सेविका आहे व ती शासकीय काम करत होती असे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे चौकशी करून त्या महिलेला सोडून देण्यात आले.
- शेषराव उदार
पोलीस निरीक्षक सिल्लोड.
बॅनरची फाडाफाडी :
सिल्लोड शहरात एका प्रभागात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तर एका प्रभागात भाजपच्या उमेदवारांचे बॅनर अज्ञात लोकांनी फाडल्याची तक्रार सुद्धा त्या त्या उमेदवारांनी निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांकडे केली आहे
सिल्लोड येथील एका प्रभागात पैसे वाटप व दोन प्रभागात बॅनर फाडल्याच्या तक्रारी आल्या आहे. याची चौकशी करण्याचे आदेश पोलीस व आचार संहिता पथकाला देण्यात आले आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी व उमेदवारांनी प्रचार करावा पण कुणाला डीस्टफ होईल असे कृत्य करू नये चौकशी अंती कार्यवाही केली जाईल.
- निलेश अपार, निवडणूक निर्वाचन अधिकारी,
सिल्लोड.











