पैठण, (प्रतिनिधी) : नगर पालिका निवडणुकीचा रविवारी निकाल लागल्यानंतर सायंकाळी भावकीतील दोन गटात आपसात हाणामारी झाल्याचा प्रकार झाला होता. या संदर्भात दोन्ही गटाच्या २६ लोकांविरुद्ध दंगल करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पैठण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. असून पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतले आहे इतर आरोपींचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी दिली.
पोलिस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी पैठण शहरातील नेहरु चौक येथील खाटीकवाडा परिसरात या दोन्ही गटाचे लोक एकत्र येऊन जमाव जमवुन आप आपसात लाकडी दांडे हातात घेऊन हाणामारी व दगडफेक केलीहोती. यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक महादेव गोमारे हे घटनास्थळी फौजफाट्यासह दाखल झाले होते त्यांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले. यानंतर यातील जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते.
या घटनेत सहभागी असलेले सोहेल शकील कुरेशी, साहील शकील कुरेशी, समीर चाँद कुरेशी, मेहमुना चाँद कुरेशी, सकीना शकील कुरेशी, मुडसर कासीम कुरेशी, मोहसीन कासीम कुरेशी, हानिफ बाबामीया कुरेशी, इग्रान मन्नान कुरेशी, मन्नान बाबामियाँ कुरेशी, इग्रान मन्नान कुरेशी, मन्नान बाबामियाँ कुरेशी, इरफान मन्नान कुरेशी, इरशाद मन्नान कुरेशी, शाहारुख मुस्ताक कुरेशी, तोसीफ माजीद कुरेशी, दानिश मुस्ताक कुरेशी, रेहान इरफान कुरेशी, अकबर रज्जाक कुरेशी, खाजाबी सलीम कुरेशी, शमीम मन्नान कुरेशी, शिरीन इम्रान कुरेशी, सलीम शमशोद्दीन कुरेशी, इद्रीस सलीम कुरेशी, शकील सलीम कुरेशी, अजीज सलीम कुरेशी, सर्फराज चाँद कुरेशी सर्व (रा. कुरेशी मोहल्ला पैठण) अशी या २६ आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संभाजी खाडे हे करीत आहेत. दरम्यान या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.















