वैजापूर, (प्रतिनिधी): गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना ने शनिवारी सायंकाळी चडली. शहरातील हॉटेल शान-ए-- मराठासमोर चडलेल्या या घटनेत कत्ती, कोयता, दांडे आणि 1 लोखंडी रॉडचा वापर करून एकमेकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या मारहाणीत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
गणपती विसर्जन न मिरवणुकीच्या वेळी झालेल्या - वादाचे रूपांतर पुन्हा एकदा हिंसक संघर्षात झाले. दोन्ही गटांतील सदस्यांनी एकमेकांवर शस्त्रांनी - हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर - जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.
-- ५० जणांविरुद्ध गुन्हा --
त्यानुसार जवळपास ५० जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वैजापूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान कृष्णा जाधव व भूषण पवार यांच्यात वाद झाला होता. हा वाद अद्याप धुमसत आहे. या वादातून दोन्ही गटांकडून एकमेकांना ठार करण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला. या वादात भूषण पवार व कृष्णा चंद्रकांत जाधव हे गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून शान पवार, रोहित पठारे, प्रीतेश साळुंके, विशाल पवार, तुषार पठारे, आदेश शेवाळे, नितीन होंड, गौरव होंड, गजू राजपूत, क्रिश राजपूत, संकेत आहेर, प्रतीक लुटे, सुजित ठाकूर, विशाल कडे, रोहित आहेर, हर्षद राजपूत, अमर राजपूत, तुषार आहेर, मयूर राहाणे आदींसह ५० जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक विनय सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक युवराज पाडळे हे करीत आहेत.















