पैठण, (प्रतिनिधी): संत ज्ञानेश्वर उद्यानामध्ये नियमितपणे शेवाळ काढणे, पायऱ्यांची स्वच्छता करणे आणि आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
या सर्व बाबीकडे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. संत ज्ञानेश्वर उद्यान पुन्हा बंद पाडण्याचा घाट पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा दिसत आहे. घसरून पडण्याचा धोका वाढतो. तिकीट घराची दुरवस्था; भिंतींवर गुटख्याचे डाग उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील तिकीट घराच्या स्वच्छतेबाबतही नाराजी व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी तिकीट विक्री करणारे कर्मचारी सरासपणे गुटखा खाऊन तिकीट घरातील
भिंतीवर थुंकत असल्याने भिंती रंगून गेल्या आहेत.
गुटखा खाल्ल्यानंतर जागेवरूनच भिंतीवर पिचकारी मारल्या जात आहेत. या कर्मचाऱ्यांच्या तोंडात गुटखा भरलेला असल्याने पर्यटकांना ते काय बोलतात हे कळत नाही. विशेष म्हणजे हे तिकीट विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गळ्यामध्ये ओळखपत्र सुद्धा नसते धक्कादायक प्रकार म्हणजे सामाजिक कार्यकर्ते किशोर तांगडे यांच्या वाहनामध्ये मुलं नसताना त्यांची दोन मुलं वाहनात दाखवून वीस रुपयाचे तिकीट देण्यात आले.
या सर्व बाबीकडे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसत असून संत ज्ञानेश्वर उद्यान पुन्हा बंद पाडण्याचा घाट पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा दिसत आहे. या संदर्भात लवकरच मी पैठणकर सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने संबंधित खात्याच्या मंत्राकडे तक्रार करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते किशोर तांगडे यांनी सांगितले आहे.













