शहरात वाढली थंडी; प्रतिदिन तापमान बारा ते तेरा अंशावर

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो:राज्यभरात सध्या थंडीची लाट जाणवत आहेत.  विशेषतः मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र इत्यादी भागात थंडीची लाट वाढली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीचा कडाका कायम असून शहरातील किमान तापमान गेल्या काही दिवसांपासून १२- १३ अंश सेल्सिअसदरम्यान स्थिर आहे. सकाळ-संध्याकाळ वाढलेल्या गारव्यामुळे नागरिकांची थंडीने गारठून अवस्था झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील यंदाचे तापमानात चांगलीच घट होताना पाहायला मिळत आहे. सध्या तापमान हे प्रतिदिन बारा ते तेरा अंशावर गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरवासीयांना चांगलीच थंडी जाणवायला लागली आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे रस्त्यांवरील नागरिकांची वर्दळ कमी झाली असून गरम कपड्यांच्या खरेदीलाही उधाण आले आहे. मौसम विभागाने ही स्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे..थंडीमुळे लोक सकाळ-संध्याकाळ थंडीत कमी बाहेर पडत आहेत. लहान मुलं, शाळकुडे, वृद्ध नागरिक हे विशेषत: थंडीच्या तापमानामुळे जास्त प्रभावित होत आहेत. यात आणखी घट होऊन थंडी जाणवेल असा अंदाज हवामान तज्ञाकडून वर्तविला जात आहे.

पंधरा तारखेनंतर आणखी तापमानात घट होण्याची शक्यता

सध्या काही दिवस तरी मराठवाड्यात आणि छत्रपती संभाजीनगर शहरात तापमान स्थिर राहील. यात आणखी घट होण्याचा अंदाज आहे. पंधरा डिसेंबरपर्यत तरी तापमान स्थिर राहील. पंधरा तारखेनंतर आणखी तापमानात घट होऊन थंडी जाणवेल. तापमान आठ अंश सेल्सिअसपर्यत जाण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना वर्तविला आहे.