धम्माचलच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : आ सत्तार

Foto
फर्दापूर येथे २१ वी अखिल भारतीय धम्म परिषद उत्साहात

सिल्लोड, सोयगाव (प्रतिनिधी) : फर्दापूर येथील धम्माचलच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे आमदार अब्दुल सत्तार या वेळी म्हणाले.

बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझम यांच्या वतीने आयोजित २१ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद फर्दापूर (ता. सोयगाव) येथे उत्साहपूर्ण चपेटी वातावरणात संपन्न झाली. या परिषदेला पालकमंत्री संजय सिरसाट, माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार, नंदकुमार घोडोले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी देशाच्या विविध भागांतून आलेले भिक्खू संघ, बौद्ध धम्मगुरू, उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

परिषदेच्या प्रारंभी आमदार अब्दुल सत्तार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. परिसरात सुरू असलेल्या यात्रा निवासाच्या बांधकामाची पाहणी केली. यानंतर धम्माचल परिसरातील भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.

या परिषदेस परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार गायकवाड, परिषदेचे उद्घाटक भदन्त करूणानंद महाथेरो ( दिल्ली), परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड, भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, तसेच शिवसेना तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण, संतोष बोडके, सयाजीराव वाघ, अक्षय काळे, राधेश्याम जाधव, श्रावण राठोड, विशाल चव्हाण, रमेश भंगी, मोहन सुरडकर यांच्यासह विविध मान्यवर, भिक्खू संघ, उपासक व उपासिका उपस्थित होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत अंतिम बैठक घेऊन प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यासाठी आपण विशेष पाठपुरावा करणार आहोत. 

यावेळी त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्कचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याची माहिती दिली. तसेच धम्माचल परिसरात यापूर्वी करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. या परिसराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कामांची माहिती देत धम्माचलच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करून २१ व्या अखिल भारतीय धम्म परिषदेच्या आयोजनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच धम्माचल परिसरातील विविध विकासकामांसाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करून, या विकासकामांसाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देवू अशी ग्वाही दिली.