मानसिकता ओळखून संवाद ही यशाची गुरुकिल्ली : डॉ. जी. एस. दळवी

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): मानसिक आरोग्य या विषयावर संवाद साधताना आपण स्वतः स्वतःशी कसा संवाद साधतो म्हणजेच स्वतःच्या नजरेत स्वतःला कसे पाहतो हा मानसिक आरोग्याचा आधारस्तंभआहे. असे प्रतिपादन भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयात बोलताना सिल्लोड येथील मूकबधिर विद्यालयाचे जी. एस. दळवी यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मानसिकता ओळखून संवाद साधत असू तर ती यशाची गुरुकिल्ली ठरेल. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींचा थेट आपल्या मानसिक आरोग्याशी संबंध येताना आपण त्यावर कसा विचार करतो. पौगंडावस्थेत भावनिक आरोग्य सुद्धा महत्त्वाचे आहे. भावनिक आरोग्याला मुलांच्या विश्वात ज्ञानविकास विद्यालयात विद्यार्थ्यांशी थेट संवाद आई-वडिल, शिक्षक मित्र मैत्रिणी आकार देत असतात.

स्वतःच्या भावना निरोगी मनाने व्यक्त करणे, इतरांच्या भावना ओळखून संतुलित प्रक्रिया देणे इ. गोष्टी भावनिक आरोग्याला अधोरेखित करतात. आत्मविश्वास कसा विकसित करावा याबद्दल बोलताना आपण एखादे कार्य यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो ही क्षमता मनात निर्माण होणे होय. अपयशातून खचून न जाता अशा प्रसंगी आत्मविश्वास निर्माण करता आला पाहिजे. 

शेवटी अभ्यास सवयी विकसित करण्यासाठी मानसशास्त्रीय तत्व आणि तंत्राच्या उलगडी विद्यार्थ्यांसोबत करण्यात आल्या. यावेळी ग्यानोजी दळवी यांच्यासह ज्ञानविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक, सहशिक्षकवृंद, शालेय वाहनचालक मालक यांची उपस्थिती होती. यावेळी श्री दळवी यांचा शाळेच्या वतीने समाधान निकम लिखित मानवाच्या उत्क्रांतीची गोष्ट हा कवी संग्रह भेट देऊन सन्मान करण्यात आला.