मृताच्या वारसांना ५० लाख देण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले असून, या प्रकरणी थेट राज्याच्या मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिक्षक बोरसे यांच्या मृत्यूनंतर स्थानिक पातळीवर तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, आता हा लढा थेट आयोगापर्यंत पोहोचला आहे.
या मारहाण प्रकरणास जबाबदार असलेल्या दोषी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा. तसेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एस.आय.टी. (विशेष तपास पथक) स्थापन करण्याचे आदेश गृह विभागाच्या मुख्य सचिवांना द्यावेत, अशी मागणी अॅड. ज्ञानेश्वर पवार (पाथरेकर) यांनी केली आहे. उच्च न्यायालयातील अॅड. पवार यांनी अर्जात म्हटले आहे की, शासनाने मृताच्या वारसांना ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. भविष्यात अशा संवेदनशील घटनांना आळा घालण्यासाठी जबाबदार आणि असंवेदनशील पोलिस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्याच्या गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे न सोपवता, एस.आय.टी. मार्फत या संपूर्ण घटनेची चौकशी करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions









